शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

नाशिकरोड परिसरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:17 IST

परिसरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते़

नाशिकरोड : परिसरातील शाळा, महाविद्यालय व विविध संस्थांच्या वतीने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते़जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका सुनिथा थॉमस यांच्या हस्ते श्री सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका दीपाली भट्टड यांनी गुरू आणि शिष्य यांच्या नात्यांची परंपरा सांगितली.विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पल्लवी मंडलिक, सुरेखा तायडे, शगुन ध्रुव, अंबिका नायर, अंकिता आढाव, जयश्री पाटील, मेघा कनोजिया, वृषाली काबडे, सुचित्रा पवार, जयश्री बोरोले, प्रवीण अहिरे आदी उपस्थित होते.आनंद हास्ययोग क्लबआनंद हास्ययोग क्लबच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमास आठवले शास्त्री यांचे अनुयायी सावळीराम तिदमे म्हणाले की, वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनातील विकारांचे प्रदूषण निर्मूलन करणेस प्रेरणा व बळ देणाऱ्या व्यक्ती, ग्रंथ, संस्था, घटना व सृष्टी हे आपले गुरू आहेत. ईश्वराने सृष्टीत गुरूत्व पेरून ठेवले आहे. त्याचा शोध घेऊन स्वत:सह इतरांना शुद्ध, पवित्र व सामर्थ्यसंपन्न दृष्टी व वृत्ती अंगीकारणे म्हणजे गुरुपौर्णिमा साजरी करणे होय, असे तिदमे यांनी सांगितले. यावेळी स्वाध्यायी नारायण लिंगायत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद हास्य क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. वसंतराव पेखळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. ज्ञानेश्वर गायकवाड, मधू कटाळे उपस्थित होते. कार्यक्रमास सुरेश सोनवणे, प्रकाश सौदागर, विद्या माळवे, आशा बोराडे, सुरेखा दुसाने, लता गवळी, शोभा नागपुरे आदी उपस्थित होते.संत आईसाहेब स्कूल४पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक टी. के. गाडे यांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी साई आगळे, वैष्णवी झाडे, ओमप्रकाश आडके, ऋतिक भोर, रूतुजा नवाळे, मानसी गायधनी, हर्षदा झाडे यांनी गुरू व शिष्याच्या नात्यावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विद्यार्थी नितीन गायधनी होता. सूत्रसंचालन गंगोत्री ढेरिंगे व आभार अश्विनी गायधनी हिने मानले. यावेळी एस. व्ही. बोरसे, एस. ए. जाधव, एन. जी. देवकर, व्ही.वाय. पवार आदी उपस्थित होते.स्वानंद आध्यामिक केंद्रडी.जी.पी.नगर येथील ओम श्री स्वानंद आध्यामिक ध्यानधारणा केंद्रात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ओम शिवांजनेय हरिहर दत्त सेवा आश्रमाचे संचालक महंत श्री स्वामी सेवकदास योगानंद माउली म्हणाले की, पूर्वी एक गुरू एक शिष्य संकल्पना होती. आता एक गुरू अनेक शिष्य झाले आहेत. जीवनात अन्न, वस्त्र निवारा याप्रमाणे गुरूचे महत्त्व आहे. खरे साधू-संत यांची कृपा प्राप्त होण्यासाठी गुरूंना शरण जावे लागते. गुरू व्यक्ती, देह व शरीर नाही तर ती एक शक्ती व तत्त्व आहे. त्यांची कृपा साधनेने प्राप्त होते, असे प्रतिपादन महंत श्री स्वामी सेवकदास योगानंद माउली यांनी सांगितले. यावेळी भक्तांनी पंचदीप, भजन, गुरुगीता पठण, प्रवचन, ध्यानधारणा, आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच पंढरपूरला पायी जाणारे वारकरी, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश हांडोरे, लता हांडोरे, भाऊराव आहेर, नितीन आव्हाड, मंदा खर्जुल, दुर्गा पवार, रत्नाकर कुलकर्णी, भानुदास साळी आदी उपस्थित होते.महाराष्टÑ हायस्कूल; उपनगरउपनगर महाराष्टÑ हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष आर. व्ही. जोशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष ना. सी. पाटील, सचिव सुभाषचंद्र वैद्य, के.एल. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पालक-शिक्षक संघ पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थी आदिती संसारे, रूपाली आहेर यांनी गुरूंचे महत्त्व सांगितले. तर शिक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनी गुरु पौर्णिमा दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी डॉ. जयेश पाटोळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना डिक्शनरीचे वाटप करण्यात आले. तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश घरटे यांनी केले. स्वागत प्रेरणा साबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली जायभावे व आभार केशव ठोंबरे यांनी मानले. यावेळी शिक्षक तानाजी पाटोळे, मोनिका चौधरी, सुनील सोनवणे, बाळू चौधरी, योगीता साळवे, वंदना ठाकूर, बिंदू वाघेला, युवराज दंडगव्हाळ, भरत खेलुकर, मधुकर साळी, अनिल गोसावी, कारण खुडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमGuru Purnimaगुरु पौर्णिमा