शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

अधिकमासानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:46 PM

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे आधिकमास निमित्ताने चार दिवस विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले. यावेळी ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख व उपजिल्हाधिकारी गोविंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. चास येथे आधिकमास महिन्याचे औचित्य साधून महंत काशिकानदंजी महाराज यांच्या प्रेरणेने व निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवशीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच नंदाताई भाबड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास व्यासपीठावर आमदार राजाभाऊ वाजे, माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. शीतल सांगळे, ह.भ.प.निवृत्ती देशमुख, शिवसेना नेते उदय सांगळे, बाजार समितीचे संचालक सुनील चकोर, जगन्नाथ खैरनार उपस्थित होते. ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्ती पुरस्कार मिळाला तसेच सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र गोविंद शिंदे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्यानिमित्ताने चास ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देवून देशमुख व शिंदे यांना गौरविण्यात आले. निवृत्ती महाराज देशमुख यांचे काम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी असून राज्यभर ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व व्यसनमुक्तीसाठी अहोरात्र सेवा करत असल्याचे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी केले. तसेच गोविंद शिंदे यांची उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने निश्चितच तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगन्नाथ खैरनार, संपत खैरनार, बंडुनाना भाबड, संजय खैरनार, चंद्रशेखर खैरनार, सचिन बिडगर, विश्वास भाबड, गुलाब गोसावी, शांताराम सोनवणे, भारत भाबड, बबनराव खैरनार यांनी परिश्रम घेतले. बंडूनाना भाबड यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक