मनपा शाळा १७ मध्ये पालक मेळावा उत्साहात
By Admin | Updated: July 8, 2014 00:58 IST2014-07-08T00:35:19+5:302014-07-08T00:58:36+5:30
मनपा शाळा १७ मध्ये पालक मेळावा उत्साहात

मनपा शाळा १७ मध्ये पालक मेळावा उत्साहात
नाशिक : गांधीनगर येथील मनपा शाळा क्रमांक १७ मध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पूर्व प्रभाग सभापती प्रा. कुणाल वाघ होते. यावेळी वाघ यांनी शाळेत इयत्ता आठवीचा वर्ग सुरू झाल्याची माहिती देतानाच पालकांनी पाल्याची घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रीमती साधना गवारे यांनी, तर सूत्रसंचालन श्रीमती कांचन शिरसाठ यांनी केले. अनुपमा करंजे यांनी आभार मानले.