चांदवड शहरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 09:09 PM2020-06-20T21:09:40+5:302020-06-20T23:32:19+5:30

चांदवड : येथील आयटीआय रोडवरील मोरे मळा हद्दीमध्ये एका ५९ वर्षीय पाहुणा रुग्णाचा अंत झाला. त्या मृत पाहुण्याच्या संपर्कातील अजूनही पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.

Excitement over finding five more corona patients in Chandwad city | चांदवड शहरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळल्याने खळबळ

चांदवड शहरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण आढळल्याने खळबळ

Next
ठळक मुद्देमाहिती प्रशासनापासून लपवून ठेवणे या बाधितांच्या संख्या वाढीस कारणीभूत

चांदवड : येथील आयटीआय रोडवरील मोरे मळा हद्दीमध्ये एका ५९ वर्षीय पाहुणा रुग्णाचा अंत झाला. त्या मृत पाहुण्याच्या संपर्कातील अजूनही पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे यांनी दिली.
चांदवडची संख्या दहावर गेली आहे. या नव्याने आलेल्या पाच जणांमध्ये ६२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, तर आठ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यापूर्वी गेल्या रविवारी मुल्लावाडा परिसरात चार रुग्ण कोेरोनाबाधित सापडले. त्यानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयातील एक २५ वर्षीय कोविड योद्धा पॉझिटिव्ह आल्याने संख्या आता दहा झाली आहे. त्यामुळे बाधित सापडलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.नातलगांच्या येण्यामुळे डोकेदुखी : तालुक्यातील वाढता कोरोनाबाधितांचा आकडा हा काळजीचा विषय ठरत आहे. तर मुंबई-पुण्यासह इतर ठिकाणांहून येणाऱ्या पाहुणे मंडळींचा पाहुणचार येथील नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेकांकडून पाहुण्यांची माहिती प्रशासनापासून लपवून ठेवणे या बाधितांच्या संख्या वाढीस कारणीभूत ठरत आहे.

Web Title: Excitement over finding five more corona patients in Chandwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.