मालेगावी वटपौर्णिमा उत्साहात

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30

मालेगाव : शहर - तालुक्यात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Excitement of Malegaon Watpanarnima | मालेगावी वटपौर्णिमा उत्साहात

मालेगावी वटपौर्णिमा उत्साहात

मालेगाव : शहर - तालुक्यात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध मंदिरे, आश्रम व शाळा - महाविद्यालय आवारात असलेल्या वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलावर्गाची गर्दी दिसून आली.
वटपौर्णिमेनिमित्त येथील बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. सकाळपासून शहरातील बाजारपेठेत नेहमीपेक्षा अधिक गर्दी दिसून आली. वटपूजेचे साहित्य व आंब्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल, कॅम्परोड, सटाणानाका, कॅम्प सोमवार बाजार आदि भागात आंबे व वटपूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होती. शहर तालुक्यातील विविध प्रमुख मंदिरे, गावातील चौक, आश्रम तसेच शाळा - महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुवासिनींची गर्दी झाली होती. घरोघरी आंबारसाची मेजवानी होती.
शाह विद्यालयात
वटपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम
मालेगाव : येथील श्री. र. वी. शाह विद्यालयात वटपौैर्णिमा सणानिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक एल. एम. तिळवणकर होते. एन. के. गायकवाड यांनी निसर्ग संवर्धन, वृक्षलागवड वृक्षसंवर्धन याविषयीची माहिती प्रास्ताविकात दिली. राष्ट्रीय हरितसेना समितीचे प्रमुख एम. पी. सूर्यवंशी यांनी वटपौर्णिमा सणाचे व त्या अनुषंगाने वडाच्या झाडाचे महत्त्व सांगितले. यावेळी सौ. एस. पी. बेलन, के. पी. मुसळे, एम. एस. पवार आदि उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Excitement of Malegaon Watpanarnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.