टाकळी येथे दासनवमी उत्साहात
By Admin | Updated: February 14, 2015 00:13 IST2015-02-14T00:13:05+5:302015-02-14T00:13:29+5:30
टाकळी येथे दासनवमी उत्साहात

टाकळी येथे दासनवमी उत्साहात
उपनगर : आगर टाकळी येथील श्री समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.
दासनवमी निमित्त सकाळी गोमेय हनुमान मंदिरात अभिषेक, महापूजा, आरती व समर्थांच्या पादुकांचे पूजन सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेंद्र मुळे यांचे ‘श्री समर्थांचे ११ मारुती’ या विषयावर प्रवचन झाले, तर विजया भट यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कर्ष भजनी मंडळ व वैष्णवी भजनी मंडळाने समर्थांवरील विविध भजने सादर केली. सायंकाळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या हस्ते देवस्थानाच्या वेबसाइटचे उद्घाटन पार पडले. यावेळी देवस्थान समितीचे सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, प्रकाश पवार, अॅड. विजय माहेश्वरी, अॅड. दिलीप कैचे, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी
होती. (वार्ताहर)