के.आर.टी.हायस्कूलमध्ये समाजदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:23+5:302021-08-20T04:19:23+5:30
प्रथम कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन विलासराव कड यांच्या हस्ते संपन्न झाले. ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रमेश ...

के.आर.टी.हायस्कूलमध्ये समाजदिन उत्साहात
प्रथम कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन विलासराव कड यांच्या हस्ते संपन्न झाले. ध्वजारोहण स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रमेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, काकासाहेब वाघ, गणपतदादा मोरे,अण्णासाहेब मुरकुटे, डी. आर. भोसले, विठ्ठलराव हांडे, ॲड. बाबूराव ठाकरे, वसंतराव पवार यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकांतून संस्थेच्या यशाचा व सद्य:स्थितीचा परिचय मुख्याध्यापक डी. बी. चंदन यांनी करून देताना कर्मवीरांच्या योगदानाची ओळख करून दिली. शिक्षक मनोगत जी. बी. उगले, के. आर. काळे, ए. आर. जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजीराव शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मवीरांपासून प्रेरणा घेऊन समाज विकासास हातभार लावण्याचे आवाहन विलासराव कड यांनी केले. याप्रसंगी आबासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, माधवराव देशमुख, भास्करराव फुगट, गंगाधर निखाडे, किसनराव मोरे, माजी सेवक संचालक बी. आर. पाटील, मनोहर धूम, राकेश थोरात, राजेंद्र थोरात, दुर्गेश चितोडे, राजू महाले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एल. कड यांनी केले.