त्र्यंबकवासीयांमध्ये उत्साह
By Admin | Updated: September 25, 2016 00:44 IST2016-09-25T00:13:01+5:302016-09-25T00:44:08+5:30
त्र्यंबकवासीयांमध्ये उत्साह

त्र्यंबकवासीयांमध्ये उत्साह
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरसह तालुक्यातील १७ गावांमधील मोर्चेकरी मराठा क्रांती मूक मोर्चासाठी खंबाळे येथून सकाळी नऊ वाजता रवाना झाले. मोर्चाला जाण्याकरिता १७ गावांमधील महिलांची वाहतूक करण्यासाठी १७ बसेस सपकाळ नॉलेज हबतर्फे देण्यात आल्या होत्या. ७० ते ८० पिकअप व्हॅन, ११० जीप, खासगी कार वगैरे तर १५० मोटार सायकलमधून मोर्चेकऱ्यांना नाशिक येथे नेण्यात आले.
खंबाळे येथून नाशिक येथे जाणारी त्र्यंबकची वाहने मोर्चाद्वारे जाण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी. आपापल्या वाहनाने किंवा जमेल तसे सर्व मराठाबांधव खंबाळा पार्किंगवर जमा होऊन वरील वाहनांतून एकत्रितरीत्या रवाना झाले.
या मोर्चासाठी जवळपास १०० स्वयंसेवकांनी गाइडची भूमिका ठिकठिकाणी पॉइंटवर उभे राहून केली. त्र्यंबकेश्वर कोअर कमिटीने मोर्चाचे नेतृत्व केले. यामध्ये संपतराव सकाळे, पुरुषोत्तम कडलग, रवींद्र सपकाळ, सुरेश गंगापुत्र, योगेश तुंगार, बहिरू मुळाणे, नवनाथ कोठुळे, समाधान बोडके, युवराज कोठुळे, कैलास मोरे, अॅड. भास्कर मेढे, रवींद्र वारुंगसे, मनोहर मेढे, कैलास मोरे, अंजना कडलग, बाळासाहेब सावंत, सुनील अडसरे, धनंजय तुंगार, सुनील लोखंडे, प्रभावती तुंगार, यशोदा अडसरे, ललिता शिंदे, डॉ. पंकज बोरसे, अॅड. संदीप मोरे, मनोज गंगापुत्र, मनोहर महाले आदिंचा समावेश होता.