लासलगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: August 5, 2016 02:08 IST2016-08-05T02:07:26+5:302016-08-05T02:08:33+5:30
लासलगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

लासलगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व व्यापाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी पाळलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर झालेल्या सभेत मारहाणीच्या प्रकार निंदनीय असून, शेतमालाचे लिलाव बंद करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही तसेच पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केली