शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
‘१५ सेकंदांसाठी पोलीस हटवा, कळणारही नाही की…’ नवनीत राणांचं ओवेसी बंधूंना आव्हान, एमआयएम संतप्त
3
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
4
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचं खुलं पत्र; अभिनेत्री रेणुका शहाणेंना सुनावले खडे बोल
5
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरणीचं सत्र सुरूच; Hero Motocorp मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला
6
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
7
गुणरत्न सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा दणका; एसटी बँकेवरील संचालकपद रद्द
8
Paytm Share Price : आपटून 'ऑल टाईम लो'वर Paytm चा शेअर; IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोक्याला हात लावायची वेळ
9
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
10
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
11
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
12
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
13
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
14
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
15
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
16
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
17
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
18
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
19
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
20
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका

मद्यविक्रीकरिता उत्पादन शुल्क विभागाने लढविली शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 6:59 PM

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ...

ठळक मुद्दे ८ तासात ४०० लोकांना मद्यविक्री सहज करता येऊ शकेलगर्दी झाल्यास कायदेशीर कारवाई

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा झाले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले. पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य स्वरुपात बळाचाही वापर करावा लागला होता. यानंतर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी तत्काळ मद्यविक्री बंदीचे आदेश काढले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्यविक्रीबाबतचे व्यवस्थापन सोपविण्यात आले असून या विभागाने चाचपणी शहरात सुरू केली आहे. उत्पादन शुल्क विभाग गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विक्रेत्यांना टोकन पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रवृत्त करत असून शहरात टोकन किंवा कुपनद्वारे मद्यविक्री मर्यादित ग्राहकांना केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान, राज्य उत्पादन उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य दुकाने सुरु करण्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती मिळताच शहरातील मद्यव्रिकीची दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पुन्हा शेकडोंच्या संख्येने मद्यपींनी आपल्या जवळच्या दुकानांजवळ कुपन अथवा टोकन घेण्यासाठी रणरणत्या रांगा लावल्याचे दिसून आले.यामध्ये ग्राहकाला ठराविक चिट्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वत:चे नाव, मोबाईल नंबर, मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यावयाच्या आहेत. यानुसार दर तासाला ५० ग्राहकांना मद्य विक्र ी केले जाऊ शकते असा अंदाज राज्य उत्पादन विभागाकडून वर्तविला गेला आहे. दिवसभरातून एकूण ४०० ग्राहकांना मद्यविक्र ी केली जाईल. अगोदरच्या दिवशी ज्या ग्राहकांना मद्य मिळू शकले नाही त्यांना दुसºया दिवशी मद्य उपलब्ध करून देण्याची सोय करावी असेही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी सांगितले आहेत.अंचुळे यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार, ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्र मांक देण्यात यावा. जर टोकन उपलब्ध नसतील तर एका को-या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दुरध्वनी क्र मांक देऊन त्यावर अनुक्र मांक द्यावा. तो अनुक्र मांक ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचच असावा साधारणपणे अशा ५० ग्राहकांना सेवा एका तासात दिली जावू शकते. त्यानंतर पुढील तासात ५१ ते १०० क्र मांक असे ८ तासात जास्तीत जास्त ४०० लोकांना मद्यविक्री सहज करता येऊ शकेल असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.गर्दी झाल्यास कायदेशीर कारवाईत्यामुळे ४००च्या पुढे येणा-या ग्राहकांना दुस-या दिवशी मद्य पुरविले जाईल, हे स्पष्टपणे सांगावे म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल, असेही स्पष्टपणे म्हटले आहे. याशिवाय दुकानाच्या अगदी जवळ कोणतही विशिष्ट वेळी ५पेक्षा जास्त ग्राहक उभे राहणार नाहीत याची पुरेपुर दक्षता संबंधित मद्यविक्री करणाºया विक्रेत्याने घ्यावयाची आहे, कुठल्याहीप्रकारे नियम व अटींचा भंग होताना आढळून आल्यास मद्यविक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई पोलीस व उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येणार आहे.मास्क व डिस्टन्स बंधनकारकदुकानदाराने दर १५ मिनीटानंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाचा टोकन क्र मांकाची सेवा सुरू आहे ते सुचनाफलकारवर नमुद करावे. यातून गर्दी कमी होण्यास मदत होईल. ग्राहकांनी तोंडाला मास्क व परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवणे आवश्यक असून यासाठी विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करुन शिस्तीत मद्यविक्री करावयाची आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.--इन्फो--निरिक्षक, दुय्यम निरिक्षक ‘झोनल आॅफिसर’विभागातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांना परिमंडळ अधिकारी म्हणुन विशिष्ट भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दीच्या एफएल-२ अनुज्ञप्तीच्या ठिकाणी वारंवार भेटी देत पाहणी करून योग्य त्या सुचना करावयाच्या असल्याचे म्हटले आहे. नियमांचे भंग करणाºयांविरूध्द कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयalcohol prohibition actदारुबंदी कायदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस