झोडगे : येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेले कपाशीचे व इतर बियाणे वाहून गेले. इतर पिकांवर परिणाम झाल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.मागील वर्षीही अतिपावसाचे थैमान झेलत शेतकरी पुन्हा जोमाने शेतीकडे वळले होते. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला होता. पावसाने रौद्ररूप धारण केल्याने शेतांमध्ये प्रचंड पाणी साचले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत. वाया गेलेला खर्च भरून निघण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात आधीच शेतीत आर्थिक नुकसान होत असणाºया शेतकºयांपुढे दुबार पेरणीचे संक ट उभे ठाकले आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहिले.
झोडगे परिसरात पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:25 IST