शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

जादा वीजबिलांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:39 IST

नाशिक : लॉकडाऊननंतर ग्राहकांना जादा रकमकेचे वीजबिल देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या असताना महावितरणने मात्र देण्यात आलेली बिले ही योग्य असल्याची भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या शंकेचे समाधान करण्याऐवजी लॉकडाऊनमध्ये लोक घरीच असल्याने विजेचा वापर अधिक झाल्याचा अजब दावा महावितरणकडून केला जात आहे, तर दुसरीकडे ज्यांनी नियमित बिले भरली त्यांना तिप्पट रकमेची बिले देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देमहावितरण मात्र ठाम : सरासरी देयक आणि वाढीव दराचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊननंतर ग्राहकांना जादा रकमकेचे वीजबिल देण्यात आल्याच्या तक्रारी वाढल्या असताना महावितरणने मात्र देण्यात आलेली बिले ही योग्य असल्याची भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या शंकेचे समाधान करण्याऐवजी लॉकडाऊनमध्ये लोक घरीच असल्याने विजेचा वापर अधिक झाल्याचा अजब दावा महावितरणकडून केला जात आहे, तर दुसरीकडे ज्यांनी नियमित बिले भरली त्यांना तिप्पट रकमेची बिले देण्यात आली आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महावितरणने ग्राहकांना छापील बिल न देता सरासरी वीजबिल देण्यात आले. मात्र सरासरी बिल भरूनही ग्राहकांना जूनमध्ये देण्यात आलेली बिले हे दीड ते चार हजारांपर्यंत आली आहेत. सदर बिले जादा रकमेची आणि मीटररीडिंग संशयास्पद असल्याचा आरोप करीत ग्राहकांकडून बिले दुरुस्त करण्याची मागणी होत असताना महावितरणने ग्राहकांना आॅनलाइन बिले तपासणीसाठीची लिंक देऊन दिलेली बिले बरोबर असल्याची भूमिका घेतली आहे.ग्राहकांना मार्च-एप्रिल आणि मे महिन्यांची सरासरी बिले दिल्याचे सांगण्यात येते, मात्र बिले भरलेली असतानाही जूनच्या बिलात त्याचा लाभ दिसत नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. एप्रिल महिन्याबाबत महावितरण सरासरी बिल दिल्याचे म्हणत आहे, ते बिल मीटररीडिंगप्रमाणे आलेले असल्याने पुन्हा सरसरी तीन महिन्यांत नमूद करण्यात आल्याचा ग्राहकांचा संशय आहे. सरासरी आणि मीटररीडिंग अशा दोन्ही पद्धतीने बिले आकारण्यात आल्याचा ग्राहकांना संशय आहे.वीज बिलासंदर्भात मात्र महावितरणकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. वीज बिल नवीन दराप्रमाणे आहेत का?, सरासरी बिले देताना मागीलवर्षीच्या फेब्रुवारी, एप्रिल आणि मे महिन्यांप्रमाणे देण्यात येणे अपेक्षित असताना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीची बिलानुसार का देण्यात आले? मीटर रिडिंगबरोबरच झाले आहे असे कोणत्या आधारे म्हटले जाते? ज्या ग्राहकांनी या तीनही महिन्यांची बिले भरली आहेत त्यांनाही जादा बिले कशी आली? मध्यंतरी ग्राहकांना २०० रुपये अतिरिक्त बिले देण्यात आलेली होती आणि ती रक्कम भरल्यानंतर ती रक्कम मूळ बिलातून वगळली आहे का? या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर महावितरणकडून मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. गाºहाणे मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावलेग्राहकांना जादा वीजबिल आल्याच्या व्यापक तक्रारी असताना महावितरणकडून मात्र वीजबिले अचूक असल्याचा दावा केला जात आहे. तांत्रिक मुद्दे पुढे करून व्यवस्था किती चोख आहे, असे महावितरण सांगण्याचा प्रयत्न करीत असतानाच लोकप्रतिनिधीदेखील महावितरणच्या विरोधात सरसावले आहे. आमदार देवयानी फरांदे आणि आमदार राहुल ढिकले यांनी बुधवारी सकाळी मुख्य अभियंता जनवीर यांची भेट घेऊन ग्राहकांचे गाºहाणे मांडले.आमदार सीमा हिरे यांनीदेखील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.अनेक राजकीय पक्षांकडूनजादा वीजबिल आकारण्याची तक्रार होत आहे. फोटो मीटररीडिंग ग्राहकांचे काय?ज्या ग्राहकांनी आपल्या मीटरचे रीडिंग दरमहा घेऊन ते महावितरणच्या संकेतस्थळावर अपलोड केले त्यांचे वीजबील जनरेट झाले; मात्र जून महिन्याचे बील त्यांनाही तीन ते चार हजारांच्या घरात आहे. त्यामुळे ज्यांनी सरासरी बिले भरली आणि ज्यांचे मीटररीडिंगनुसार बिले भरली त्यांचीही बिले ३ ते ४ हजाराने अधिक असतील तर महावितरणने फोटो मीटररीडिंग घेऊन कोणताही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.यासंदर्भात महावितरणकडे विचारणा केली असता सरासरी वीजबिल दिल्याचा निकषच अधिकारी सांगत आहे. बिलासंदर्भात महावितरणकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. बिल नवीन दराप्रमाणे आहेत का?, सरासरी बिले देताना मागील वर्षीच्या फेब्रुवारी, एप्रिल आणि मे महिन्याप्रमाणे देण्यात येणे अपेक्षित असताना डिसेंबर, जानेवारीप्रमाणे बिलाची आकारणी का करण्यात आली? मीटररिडिंगबरोबरच झाले आहे, असे कोणत्या आधारे म्हटले जाते? काही ग्राहकांनी या तीनही महिन्यांची बिले भरली आहेत,त्यांनाही जादा बिले कशी आली? मध्यंतरी ग्राहकांना २०० रुपयांचे अतिरिक्त बिले देण्यात आलेली होती आणि ती रक्कम भरल्यानंतर ती रक्कम मूळ बिलातून वगळली आहे का? या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर महावितरणकडून मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सुधारित वीजबिले देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकMSGमेसेंजर ऑफ गॉड