नाशिक : दर तीन महिन्यांनी महापालिकेतील उत्कृष्ट कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण स्वातंत्र्यदिनी महापौर अशोक मुर्तडक व आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.महापालिकेच्या वतीने एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत उत्कृष्ट काम करणारे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्वर, शाखा अभियंता एस. एम. ओस्तवाल, वरिष्ठ लेकापरीक्षक के. एन. देवरे, लिपिक अनिल वसावे, नाईक दप्तरी मोगल काळे, नाट्यगृह सुपरवायझर बी. एस. गीते, मिस्तरी सुनील कोकणे, सुतार सुदाम अहिरे, वायरमन एस. आर. लकारे, व्हॉल्वमन संजय साळुंके, हेल्पर व्ही. एल. दळवी, स्वच्छता निरीक्षक आर. पी. घोलप, सफाई कर्मचारी राजेंद्र नेटावटे, इन्चार्ज सिस्टर माया तेजाळे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे, सभागृहनेते सलीम शेख, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मनपातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव
By admin | Updated: August 23, 2015 23:19 IST