शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात राज्य सरकारविरोधात परीक्षार्थींची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 19:42 IST

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला.

ठळक मुद्देएमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी संतप्त एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी संतप्त एमपीएससी परीक्षार्थींमध्ये उमटले तीव्र पडसाद

नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनीही आयोगचे पत्र फाडून सरकारविरोधत निषेध नोंदविला. यासंदर्भात छात्रभारती विद्यार्थी संघटनने प्रशासनाला निवेदन देऊन नियोजित वेळेत परीक्षा घेण्याची मागणी केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी (दि.११) राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परिपत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने नाशिकमधील विद्यार्थ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्य टी . ए. कुलकर्णी चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करीत पूर्वनियोजित वेळेतच परीक्षा घेण्यची मागणी केली. यावेळी अभाविपच्या आंदोलकांनी चौकात अचानक आंदोलन केल्याने या भागातील वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुरुवारी परिपत्रक काढून राज्यात कोरोणाचा प्रभाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याचे नमूद करीत आता परीक्षा घेणे योग्य नाही असे पत्र पुनर्वसन विभागाचे १० मार्चला पत्र मिळाल्याचे नमूद करीत १४ मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलल्याचे स्पष्ट होते. हे पत्र फाडून गणेशवाडीतील संत ज्ञानेश्वर अभ्यासिकेत परीक्षार्थी सरकार व आयोगाविरोधात निषेध नोंदविला. परीक्षेची तयारी पूर्ण झालेली असताना परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यासाठी हे पत्र पाडल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान वारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

परीक्षार्थींमध्ये असंतोषवारंवार परिक्षा पुढे ढकलली जात असल्याने एमपीएसची परिक्षा देणाऱ्या परीक्षार्थींमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे नमूद करीत छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सरकारवाडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांना निवेदन दिले. छात्रभारतीचे प्रतिनिधीमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देण्यासाठी जात होते.मा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी अनुपस्थित असल्याने छात्रभारतीच्या प्रतिनिधीमंडळाने याच परिसरात हेमंत सोमवंशी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीagitationआंदोलन