शब-ए-बारातनिमित्त कब्रस्तानची तपासणी

By Admin | Updated: June 13, 2014 00:20 IST2014-06-12T22:37:55+5:302014-06-13T00:20:08+5:30

आझादनगर : शब-ए-बारात निमित्ताने शहरातील बडा कब्रस्तानासह शहरातील सर्व कब्रस्तानाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून गुरुवारी सकाळी कसून तपासणी करण्यात आली.

Examination of graveyard for Shab-e-Baraa | शब-ए-बारातनिमित्त कब्रस्तानची तपासणी

शब-ए-बारातनिमित्त कब्रस्तानची तपासणी

 आझादनगर : शब-ए-बारात निमित्ताने शहरातील बडा कब्रस्तानासह शहरातील सर्व कब्रस्तानाची बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून गुरुवारी सकाळी कसून तपासणी करण्यात आली.
सन २००६ मध्ये शब-ए-बारात रोजी शहरात बडा कब्रस्तान येथे बॉम्बस्फोट होऊन त्यामध्ये ३१ जणांना जीव गमवावा लागला होता. तसेच त्यात अनेकजण जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे येथील पोलीस प्रशासनातर्फे शब-ए-बारात सणानिमित्त सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना करीत कंबर कसली जात आहे.
यंदाही शुक्रवारी शब-ए-बारात सण आहे. त्यानिमित्ताने बडा कब्रस्तान येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. पोलीस पथकाकडून शहरातील बडा कब्रस्तानसह शहरातील आयेशानगर कब्रस्तान, कॅम्प, संगमेश्वर, छोटा कब्रस्तानची तपासणी करण्यात आली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. देशपांडे, पोलीस कर्मचारी भगीरथ सोनवणे, वळवी, दंडगव्हाळ, आहिरे व डॉग जिनी यांनी विशेष तपासणी केली. तसेच ही तपासणी उद्याही करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Examination of graveyard for Shab-e-Baraa