दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी
By Admin | Updated: February 6, 2016 22:50 IST2016-02-06T22:47:43+5:302016-02-06T22:50:29+5:30
दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी

दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी
नाशिक : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २०१५-२०१६ शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या दहावीतील विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती येथील माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाकडून देण्यात आली आहे.
कलचाचणी परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, सर्व नियमित विद्यार्थ्यांना ही कलचाचणी परीक्षा देणे अनिवार्य आहे. या परीक्षेसाठी प्रत्येक माध्यमिक शाळेत केंद्र असणार आहे. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०१६ मध्ये प्रथम प्रविष्ठ होणाऱ्या सर्व नियमित विद्यार्थ्यांची कलचाचणी आॅनलाइन पद्धतीने ८ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येणार असून, प्रत्येक दिवशी चार सत्रांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. परीक्षेविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. परीक्षेसाठी आवश्यक संगणक प्रणाली सर्व शाळांना विभागीय मंडळामार्फ त वितरित केली जाणार असून, याविषयीच्या अधिक सूचना विभागीय मंडळांकडून संबंधित शाळांना दिल्या जाणार आहेत.