ठळक मुद्देपेठ तालुक्यातील ११ विद्यार्थ्यांची तपासणी
पेठ : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा माळवे, डॉ. श्रीमती देवरे यांनी पेठ तालुक्यातील ११ विद्यार्थ्यांची तपासणी करून पुढील उपचारार्थ पालकांना मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हा समन्वयक सुरेखा पाबळकर, पेठ पंचायत समिती अपंग समावेशित गट साधन केंद्राच्या लीना महाले, सुनंदा सोनार, पूनम साळुंके, हेमंत भोये, नितीन पठाडे, दिनेश भरमे आदी उपस्थित होते.