माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By Admin | Updated: May 6, 2017 23:07 IST2017-05-06T23:07:26+5:302017-05-06T23:07:42+5:30

नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला

Ex Students Meet | माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
 नांदगाव : येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही. जे. हायस्कूल, नांदगावच्या शतक महोत्सवास प्रारंभ झाला असून, त्याचे औचित्य साधून नांदगाव शहराच्या विद्यालयातील जे माजी विद्यार्थी आहेत व सध्या ते ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, अशा माजी विद्यार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा नुकताच विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात विद्यालयातील १०० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक म्हणजे एक अनुभवांचे पुस्तक असते, त्यांचे जीवनातील अनुभव देशासाठी, समाजासाठी आणि कुटुंबासाठी फार महत्त्वाचे असतात तेच अनुभव व त्यांचे मार्गदर्शन शाळेला व संस्थेला मिळावे हा हेतू ठेवून या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले गेले. यात अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले व शाळेच्या विकासासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. व्ही. जे. हायस्कूल नांदगाव तालुक्याचा मानबिंदू असल्याचे सांगितले व अनेक गुणवान विद्यार्थी शाळेने घडविल्याचे सांगितले. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेला व संस्थेला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक भैया चव्हाण यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी अनेक माजी शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कुदरत अली शहा, पदाधिकारी पद्माकर दुसाने, मेजर साळुंके, घेवरचंद लोढा, कुसुमताई सावंत, श्रावण आढाव, सोनवणे याचबरोबर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन मिलिंद श्रीवास्तव यांनी केले. श्याम सोनस, भास्कर जगताप, गुलाब पाटील, विजय चव्हाण, जयंत निकम, भास्कर मधे, चंद्रकांत दाभाडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्र माचे नियोजन केले.

Web Title: Ex Students Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.