होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By Admin | Updated: September 29, 2014 00:03 IST2014-09-29T00:03:25+5:302014-09-29T00:03:42+5:30

होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

Ex-student gathering in homeopathic college | होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

होमिओपॅथिक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

चांदवड : येथील एस.एन.जे.बी. संचलित श्रीमती के. बी.आबड होमिओपॅथिक महाविद्यालात रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रेशीमगाठी -२५ हा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष अजितकुमार सुराणा, विश्वस्त नंदकिशोर ब्रह्मेचा, डॉ. सुनील बागरेचा, विश्वस्त सुमतीलाल सुराणा, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर ,प्राचार्य डॉ. टी. एन. नायर, उपप्राचार्य संगीता दोशी, बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी डॉ. नीलेश अपार या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. मेळाव्यास ७०० माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन व रेशीमगाठी -२५ उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक डॉ. सचिन अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सपना थोरात व डॉ. प्रसाद कापडणी यांनी केले. यावेळी मागील सतरा वर्षांत विषेश प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी डॉ.मनोज छाजेड, डॉ. शीतल ढिकले, डॉ. अजय परदेशी, डॉ. नीलेश अपार यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, डॉ. सुनील बागरेचा, जवाहरलाल आबड, प्राचार्य टी. एन. सी. नायर यांची भाषणे झालीत. आभार डॉ. संगीता दोशी यांनी केले.
दुसऱ्या सत्रात मनोरंजनापर कार्यक्रम खेळ, दांडियारास, समूहनृत्य कार्यक्रम झाले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संगीता दोशी, सचिव डॉ. सचिन अ्रग्रवाल, डॉ. प्रकाश कबाडे, डॉ. मनोज छाजेड, डॉ. सपना थोरात, के. के. पाटील, डॉ. प्रसाद कापडणी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. ( वार्ताहर)

Web Title: Ex-student gathering in homeopathic college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.