शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:38 IST

स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेचे अधिकारी तिची खिल्ली उडवित ‘तुला कशाला हवे घर, भीक मागून खा’ असा सल्ला देत असल्याचे निवेदन दिवंगत माजी सैनिकाची पत्नी कमल दगडू गुरव (रा़ आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी) यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांना दिले आहे़  मूळ साताºयाच्या मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात सैनिक असलेले दगडू पिलू गुरव यांच्याशी कमल गुरव यांचा विवाह झाला़ आर्टिलरी सेंटरकडून पती सैन्यात असल्याची कागदपत्रेही गुरव यांच्याकडे होती़ अपत्य नसलेल्या तसेच निराधार कमल गुरव यांनी झुणका-भाकर केंद्र तसेच छोटी-मोठी कामे करून आतापर्यंत कसाबसा आपला उदरनिर्वाह केला़ जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्या कार्यकाळात लोकशाही दिनामध्ये माजी सैनिक पत्नी कमल गुरव यांना घरकुल मंजूर केल्याचे त्या सांगतात़ त्यासाठी सर्व कागदपत्रेही त्यांनी महापालिकेला दिली. त्यांना चुंचाळे, हिरावाडी येथे घरकुल देतो असे सांगण्यात आले़ मात्र कागदपत्रेच गहाळ झाली की केली? त्यांना अखेरपर्यंत घरकुल मिळालेच नाही़ कागदपत्रे गहाळ झाली असे सांगितले जाते. त्यांच्या पतीचे सर्व्हिस बुकही हिसकावून घेतल्याचे त्या सांगतात़  अनेक वर्षांपासून त्या घरकुलासाठी महापालिकेचे सातपूर विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन या ठिकाणी खेटा मारत आहेत़ विशेष म्हणजे काही रिक्षाचालक गुरव यांच्या वृद्धत्वाकडे पाहून रिक्षाचे भाडेही घेत नाहीत़ सध्या चाळीस वर्षांपासून कमल गुरव या सातपूर कॉलनीतील भाजी मंडईत उघड्यावर राहात आहेत़ घरकुलासाठी दिलेली व गहाळ केलेली कागदपत्रे शोधून घरकुल मिळावे, असे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे.घर विकून खाऊस्वातंत्र्यपूर्व काळातील शहीद सैनिकाची पत्नी असून, निराधार असल्याने घरकुलासाठीची सर्व कागदपत्रे दिली आहेत़ मात्र, महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातील तत्कालीन व विद्यमान अधिकारी आव्हाड, गवळी, राऊत, बच्छाव हे घरकुलाची चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर ‘गाडगे महाराज मठात जाऊन राहा, तुला घर मिळणार नाही, तुझे घर आम्ही विकून खाऊ’ असे सांगतात़ महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनाही मी निवेदन दिले आहे़ त्यांनी तरी माझी दखल घ्यावी़  - कमल गुरव, माजी सैनिक पत्नी, आंबेडकर मार्केट, सातपूर कॉलनी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHomeघर