माजी सैनिकांचा मेळावा
By Admin | Updated: March 14, 2016 00:14 IST2016-03-14T00:14:03+5:302016-03-14T00:14:03+5:30
भारतीय माजी सैनिक चळवळीच्यावतीने रविवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भस्तरीय माजी सैनिकांचा मेळावा पार पडला.

माजी सैनिकांचा मेळावा
सैनिकांच्या प्रश्नावर चर्चा : भारतीय माजी सैनिक चळवळीचे आयोजन
अमरावती : भारतीय माजी सैनिक चळवळीच्यावतीने रविवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विदर्भस्तरीय माजी सैनिकांचा मेळावा पार पडला.
या मेळाव्याला ब्रिगेडियर शरद लुकटुके, कमांडर रवींद्र पाठक, ग्रुप कॅप्टन सुहास फाटक, कर्नल पी. एम. नाईक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, कॅप्टन अरविंद चांडक, सह. पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे, दिनेशकुमार गोवारे, सुनील बोबडे आदी उपस्थित होते. यावेळी सैनिक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. माजी सैनिकांना व त्यांच्या परिवाराला शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा, असे आवाहन ब्रिगेडियर शरद लुकटुके यांनी केले. तर विधवा वीर पत्नींनी बी फॉर्म भरून घ्यावा व त्यांना कशाप्रकारे पेन्शन योजनेत तरतूद केली. यासंदर्भात माहिती कर्नल रवींद्र पाठक यांनी दिली. प्रत्येक सैनिकांनी आपल्या पत्नीला आपल्या व्यवहारासंदर्भात माहिती द्यावी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात पत्नीसह भेट देऊन सैनिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती द्यावी, असे प्रतिपादन मेळाव्याला मार्गदर्शन करताना जिल्हा सैनिक कल्याण रत्नाकर चरडे यांनी केले व सर्व संघटनांनी एकत्रित येऊन माजी सैनिकांच्या समस्यांकरिता लढा द्यावा, अशी मागणी केली. संचालन दिनेश गोवारे व विलास दवने यांनी केले. ओन रँक पेन्शन, ७ वे वेतन आयोग लागू करा, निवृत्ती वेतन व माजी सैनिक अंशदायी स्वास्थ योजना आदी मागण्यासंदर्भात मान्यवरांनी मेळाव्यात चर्चा केली. यावेळी भारतीय स्थल, जल व वायूसेनेचे माजी सैनिक व त्यांच्या परिवारातील माता व पत्नी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)