एनएमसी ॲपमधून स्मार्ट लाईटच्या तक्रारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:04+5:302021-06-17T04:11:04+5:30

नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्या यासाठी महापालिकेने ॲप तयार केले आहे. इ कनेक्ट या ॲपमधून नागरिकांच्या तक्रारी थेट आधी ...

Evict smart light complaints from NMC app | एनएमसी ॲपमधून स्मार्ट लाईटच्या तक्रारी बेदखल

एनएमसी ॲपमधून स्मार्ट लाईटच्या तक्रारी बेदखल

नागरिकांच्या तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्या यासाठी महापालिकेने ॲप तयार केले आहे. इ कनेक्ट या ॲपमधून नागरिकांच्या तक्रारी थेट आधी कनिष्ठ अधिकारी आणि नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतात. त्याची सत्वर दखल घेतली जाते आणि प्रसंगी तक्रारदारास फोन देखील केला जातो. हे ॲप प्रभावी असले तरी आता त्यावरून शहरातील पथदिपांच्या तक्रारी बेदखल करण्यात आल्या आहेत. त्यावर तक्रार केल्यानंतर टाटाचे ॲप डाऊनलोड करा असे सांगितले जाते. महापालिकेच्या सोशल मीडियावर देखील टाटा कंपनीचा हेल्पलाईन नंबर आणि त्या ॲपची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रारी करण्यासाठी द्रविडी प्राणायाम करावा लागत आहे.

महापालिकेने शहरात स्मार्ट लाईटची योजना राबवली आहे. टाटा कंपनीला हे काम देण्यात आले आहे. शहरातील पथदिपांवर एलईडी दिवे बसवून त्या माध्यमातून विजेच्या होणाऱ्या बचतीतून काही रक्कम शेअरिंग करण्याच्या तत्त्वावरही हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने तक्रारींचे निराकरण देखील कंपनीकडेच दिले आहे. तथापि, महापालिकेच्या ॲपवरून पथदिपांची तक्रार करण्याची सोय काढून घेतल्याबद्दल विद्युत विभागाने देखील अनभिज्ञता दर्शवली आहे.

इन्फो..

नियंत्रण कक्ष काय कामाचा?

नाशिक शहरात स्मार्ट लायटिंग अंतर्गत ९२ हजार ४५४ एलईडी लाईट असून त्यापैकी ८७ हजार २४० एलईडी लाईटस बसविण्यात आल्या आहेत. स्मार्ट लायटिंग बसवल्यानंतर संबंधित ठेकेदाराचा नियंत्रण कक्ष असेल तेथून गरजेनुसार दिव्यांचा प्रकाश कमी जास्त करता येईल तसेच कुठे एखाद्या पथदिपात बिघाड होऊन तो बंद पडला तरी तत्काळ नियंत्रण कक्षात समजेल अशी स्मार्ट लायटिंगची योजना असल्याचे प्रशासनाच्या वतीने यापूर्वी सांगण्यात आले होते; मात्र आता तक्रारींसाठीच महापालिकेला धावपळ करावी लागत असेल तर उपयोग काय असा प्रश्न केला जात आहे.

----------

छायाचित्र १६ स्ट्रीट लाईट नावाने आर फोटोवर

===Photopath===

160621\16nsk_20_16062021_13.jpg

===Caption===

महापालिकेच्या ॲपवर पथदिपांची तक्रार केल्यास असे ॲप डाऊन लोड करण्याची सूचना येते.

Web Title: Evict smart light complaints from NMC app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.