शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

चिमणी वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज : कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:42 IST

दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देजवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत.नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे

नाशिक : दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत असलेली सिमेंटची जंगले आणि वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे जवळपास ७० टक्के चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत. तसेच नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर येत असून यासाठी आज अनेक सामाजिक संस्था काम करत आहे. त्यातलीच एक ‘निसर्गसेवक’ संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नासर्डी नदी म्हणजेच नुकतेच नावारुपाला येत असलेली ‘नंदीनी’ नदीच्या संर्वधनासाठी अहोरात्र काम करत आहे. याच पार्श्चभुमिवर संख्येचे संस्थापक अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी चिमणी संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.प्रश्न : नासर्डी बचाव उपक्रमाची सुरुवात कशी झाली?कुलकर्णी : माझ्या परिसरात पिण्याच्या पाण्याची होत असलेली नासाडी बघून मी त्यासाठी जनजागृती पत्रके वाटत फिरायचो. मात्र याला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने यासाठी उपाययोजना कराव्यात यासाठी मी प्रयत्न सुरु केले. तसेच नासर्डीच्या जवळच राहत असल्याने लहानपणापासून नदीचे होत असलेले प्रदुषण बघत होतो. त्यामुळे तीला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी महापालिकेसोबत अनेक विषयावर चर्चाही केली मात्र त्यांच्याकडून न मिळणारा सकारात्मक प्रतिसाद बघून यासाठी काही जणांना घेवुन ‘निसर्गसेवक’ संस्थेची स्थापना केली व मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी नदीच्या किनारी वृक्षरोपण करत गेलो. त्यांनतर नासर्डीचे नाव नंदिनी करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जसा गोदात्सव साजरा केला जातो तसा नंदिनीउत्सव सुरुकेला. यासाठी दिवाळीत नदीच्या किनारी दिपोत्सव व शिवार फेरी सुरु केली. तसेच नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी येथे गणपती मुर्तींचे विर्सजन न होऊन देता संकलन केले. तसेच प्रदुषणमक्त नासर्डीसाठी पाठपुरावा केल्यामुळे नुकतेच महापालिकेने नदी साफ करण्यासाठी नदीत राबोट उतरविण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढेही असेच कार्य करत राहणार आहे.प्रश्न : चिमणी बचाव उपक्रमाचा उद्देश काय आहे?कुलकर्णी : सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी परिचयाची आहे. मात्र दिवसेंदिवस शहरांमध्ये वाढत चालेली सिमेंटचे जंगले आणि वृक्षांच्या घटत्या चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे. कधी काळी अंगणात, घरात आणि अनेक वेळा जेवणाच्या ताटाजवळ येऊन बसणारी चिमणी आता दिसेनासी झाली आहे. मात्र या चिमण्यांना परत आणण्यासाठी आणि त्यांना वाचविण्यासाठीच मी उपाययोजना सुरु केली. यासाठी आजवर अनेक वनउद्यानात चिमण्यासाठी घरटे, पिण्याच्या पाण्याचे भांडे बसविण्याचे काम सुरु आहे. संस्थेतर्फे पांडवलेनी उद्यानात ‘चिमन्यांची वस्ती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात संस्थेतर्फे उद्यानात चिमण्यांना राहण्यासाठी लाकडी घरटे तयार करुन अनेक झाडांवर ही घरटे लावण्यात आली. तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी चिमण्यांना पिण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडे बसविणार आहे. तसेच यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून आपल्या घराच्या छतावर किंवा परिसरातील झाडांवर घरटे व पिण्याच्या पाण्याची भांडी लावावी. जेणेक रुन चिमण्याच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल

टॅग्स :Nashikनाशिकinterviewमुलाखतpollutionप्रदूषणbirds sanctuaryपक्षी अभयारण्य