सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

By Admin | Updated: July 21, 2014 01:31 IST2014-07-21T01:28:32+5:302014-07-21T01:31:22+5:30

सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

Everyone is committed for the safe halt | सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

सुरक्षित कुंभमेळ्यासाठी सर्वजण कटिबद्ध

 

नाशिक : पौराणिक महत्त्व असलेल्या येथील कुंभमेळ्याचे सुरक्षित व सुंदररीत्या आयोजन करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अमेरिका येथील एमआयटीचे जॉन वर्नर यांनी येथे केले़
गंगाघाटावर रामकुंडाला भेट दिल्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधत होते़ संदीप फाउंडेशन, एमआयटी नाशिक , खांडबहाले डॉट कॉम यांच्या वतीने आयोजित कुंभथॉन-३ या परिषदेसाठी हे संशोधक आले आहेत़ कुंभथॉनमध्ये शहरात होणार असलेल्या कुंभमेळ्यातील विविध समस्यांवर तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना शोधण्यात येत आहेत़ संदीप फ ाउंडेशन येथे तीन दिवस ही परिषद होणार आहे़
वर्नर म्हणाले, कुंभथॉनअंतर्गत मागील कुंभमेळ्याचा अभ्यास करण्यात येत आहे़ त्यावेळी उद्भवलेल्या प्रमुख समस्यांचा अभ्यास करून त्यावर कमी वेळात व तांत्रिक दृष्ट्या उपाययोजना करण्यात येणार आहेत़ कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, नियंत्रण, सुरक्षितता, अन्न, प्रदूषण, आरोग्याच्या समस्या यांचा यामध्ये समावेश आहे़ त्यावर भारतासह अमेरिकेत संशोधन करण्यात येणार आहे़ या संशोधनाचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येणार असून, या माध्यमातून कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्था प्रयत्न करणार आहेत़
महापौर यतिन वाघ म्हणाले, कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन, सुरक्षेच्या दृष्टीने कुंभथॉनमध्ये संशोधन केले जात आहे़ प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरणाऱ्या संशोधनांचा स्वीकार करून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न महापालिका तसेच जिल्हा प्रशासन करणार आहे़ मागील कुंभमेळ्याचा व आताच्या वस्तुस्थिती व नियोजनाचा अहवाल एमआयटीकडून महापालिकेलाही सादर होणार आहे़ आधुनिक पद्धतीने उपाययोजना होत असतील तर त्यांचे स्वागतच आहे़
याप्रसंगी टेपो जॉटन्स, पीट बेल, एम़ जे़ जॉटन्स, ब्रुस हेच, डॉ़ जॉन मॅकडॉनल्ड, अ‍ॅथनॉसी अ‍ॅथनासियाडीस, इंडिया एमआयटीचे क्षितिज मारवा, गौतम मोरे, बाल महाले, अरविंद चिंचोरे, नीलेश साळगावकर उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Everyone is committed for the safe halt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.