प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहावे : देवदत्त नागे

By Admin | Updated: October 23, 2015 21:54 IST2015-10-23T21:52:55+5:302015-10-23T21:54:33+5:30

प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहावे : देवदत्त नागे

Everybody should stay away from addiction: Devadatta Nage | प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहावे : देवदत्त नागे

प्रत्येकाने व्यसनांपासून दूर राहावे : देवदत्त नागे

नाशिकरोड : व्यायाम केल्याने आपल्यातील मान, अभिमान बाजूला पडतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित व्यायाम करावा, सर्व प्रकारच्या व्यसनांना आपल्यापासून दूर ठेवावे, असे आवाहन जय मल्हार मालिकेतील खंडोबाची भूमिका करणारे अभिनेते देवदत्त नागे यांनी केले.
जेलरोड श्री दुर्गा माता देवस्थान ट्रस्टतर्फे नवरात्रात दांडिया व सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अभिनेते नागे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयोजक नगरसेवक शैलेश ढगे उपस्थित होते. दुर्गामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवात आयोजित विविध उपक्रम व कार्यक्रमाबद्दल नागे यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी नागरे यांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’मधील नॅनो कारचे विजेते योगेश जोशी, सीडी डॉन विजेते बी. पी. जोगारे, प्लेजर गाडी विजेते कृष्णकांत भामरे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर सरोदे यांनी केले. सूत्रसंचलन प्रशांत बाळापुरे व आभार राजेंद्र तुपे यांनी मानले. यावेळी सुनील ढगे, कैलास ताजनपुरे, प्रमोद फडोळ, कैलास कानमहाले, नितीन शार्दुल, प्रवीण पगारे, अमोल कुमावत, हरिष ठाकरे, गणेश खेलुकर, पंकज खेलुकर, नितीन गोडसे, स्वप्नील चाबुकस्वार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाशिकरोड जेलरोड येथे नवरात्रोत्सव स्पर्धेतील पारितोषिक वितरणप्रसंगी अभिनेते देवदत्त नागे यांचा सत्कार करताना नगरसेवक शैलेश ढगे. समवेत राजेंद्र दुसाने, कैलास ताजनपुरे, प्रमोद फडोळ, नितीन शार्दुल.

Web Title: Everybody should stay away from addiction: Devadatta Nage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.