दररोज एक कोटी लिटर पाणी गळती

By Admin | Updated: February 3, 2016 23:10 IST2016-02-03T23:09:28+5:302016-02-03T23:10:01+5:30

बारागाव नळपाणी योजना

Every year, one million liters of water leakage | दररोज एक कोटी लिटर पाणी गळती

दररोज एक कोटी लिटर पाणी गळती

प्रवीण साळुंके मालेगाव
तालुक्यातील बारागाव पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना रोज २६ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असतांना रोज एक कोटी ४१ लाख लिटर पाणी पुरविले जात असल्याची माहिती प्रांताधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे. हे उर्वरित एक कोटी लिटर पाणी जाते कुठे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील दाभाडी, तळवाडे, आघार (खु), रावळगाव, पिंपळगाव, ढवळी विहीर, जळगाव (दा), आघार (बु), पांढरुण आदी गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी बारागाव पाणी पुरवठा योजनेची निर्मिती करण्यात आली. यासाठी तालुक्यातील शेमळी नाला येथे पाणी साठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सध्या या गावांना आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे.
या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी पुरविले जात असतांनाही या गावांना रोज किमान एकदाही पाणी मिळु नये याचे सर्वांना आश्चर्य वाटते. एकंदरीत पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची व रोजची पाण्याची मागणी यांच्या आकडेवारीची गोळाबेरीज पाहता या गावांना दिवसातून कमीत कमी चार वेळा पाणी पुरवठा करुनही लाखो लिटर पाणी शिल्लक राहाते.
कारण या गावांना चारवेळच्या पाण्यासाठी फक्त एक कोटी चार लाख पाण्याची आवश्यकता आहे. असे असतांना या गावांना आठ दिवसाआडही पाणी मिळत नाही हे विशेष आहे. हे पाणी नेमके जाते कोठे ? हा संशोधनाचा विषय आहे. हे पाणी चोरी केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पाणी कोठे व कोणाच्या आर्शिवादाने झिरपते ? ७असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Every year, one million liters of water leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.