अखेर बिटकोतील बंद स्कॅनिंग मशीन सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:44+5:302021-04-30T04:18:44+5:30
यावेळी रुग्णालयात धूळ खात पडलेले अत्याधुनिक एचआरसीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, महाजन यांनी विविध विभागांना ...

अखेर बिटकोतील बंद स्कॅनिंग मशीन सुरू होणार
यावेळी रुग्णालयात धूळ खात पडलेले अत्याधुनिक एचआरसीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, महाजन यांनी विविध विभागांना भेटी देऊन कर्मचारी व रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. आरटीपीसीआरचे रेकार्ड ठेवले जाते, तसे अँन्टिजन टेस्टचे रेकार्ड ठेवा, अशी सूचना केली. यावेळी बिटकोचे नोडल अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर यांनी रुग्णालयाबाबत माहिती दिली.
या ठिकाणी एचआरसीटी मशीन धूळ खात पडलेले दिसल्यावर, महाजन यांनी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांना फोन करून विचारपूस केली असता, नागरगोजे यांनी रेडिओलॉजिस्ट नसल्याने मशीन बंद आहे, असे स्पष्ट केले. मशिन उद्यापासून सुरू करू, असे नागरगोजे यांनी सांगितले. रेडिओलॉजिस्ट नसल्याने ते बंद असल्याने रुग्णांना अडीच हजार रुपये मोजून बाहेर स्कॅनिंग करावे लागते, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. महाजन म्हणाले की, ही बाब गंभीर आहे. रुग्णांचा मृत्यू होत असताना, मशीन बंद राहणे योग्य नाही. डॉ.नागरगोजे म्हणाले की, मशीनसाठी तंत्रज्ञ नियुक्त केले आहेत. चार रेडिओलॉजिस्टना नियुक्तीपत्र दिले आहे. दोघे त्वरित रुजू होणार आहेत. रेडिओलॉजिस्ट रुजू झाले नाही, तर खासगी रेडिओलॉजिस्ट नियुक्त करून मशीन लगेच सुरू करू, असे नागरगोजे यांनी स्पष्ट केले.
इन्फो...
गुरुवारपर्यंत सुरू करण्याच्या सूचना
बिटकोतील एचआरसीटी स्कॅनिंग मशीन, तसेच एमआरआय हे मशीन बंद असून, ते गुरुवारी सुरू झालेच पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेतील दोशींचे कोणीही समर्थन केले जाणार नाही आणि दोषींवर कारवाई होईलच, असेही महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
छायाचित्र आर फोटोवर २८ गिरीश महाजन