शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

अखेर बिटकोतील बंद स्कॅनिंग मशीन सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:49 IST

नाशिक रोड : गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी महापाालिकेचे नवीन बिटको रुग्णालय हे उपयुक्त ठरत असताना, या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळ आणि बंद पडलेले उपकरण अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे ह्यलोकमतह्णने याबाबत नागरिकांची कैफियत मांडल्यानंतर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर, महाजन यांनी वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारला, त्यावर त्यांनी चार रेडीओलॉजिस्ट नियुक्त करण्यात आले असून, लवकरच बंद स्कॅनिंग मशीन सुरू होणार असल्याची माहिती दिली.

ठळक मुद्देगिरीश महाजन यांची पाहणी: वैद्यकीय अधीक्षकांची ग्वाही

नाशिक रोड : गोरगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी महापाालिकेचे नवीन बिटको रुग्णालय हे उपयुक्त ठरत असताना, या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळ आणि बंद पडलेले उपकरण अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे ह्यलोकमतह्णने याबाबत नागरिकांची कैफियत मांडल्यानंतर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीत नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर, महाजन यांनी वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारला, त्यावर त्यांनी चार रेडीओलॉजिस्ट नियुक्त करण्यात आले असून, लवकरच बंद स्कॅनिंग मशीन सुरू होणार असल्याची माहिती दिली.

नाशिक शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि.२८) नवीन बिटको रुग्णालयात भेट देऊन पहाणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गीत, आमदार राहुल ढिकले, पक्षाचे नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेविका संगीता गायकवाड, हिमगौरी आडके, सतीश सोनवणे, अंबादास पगारे, हेमंत गायकवाड उपस्थित होते.यावेळी रुग्णालयात धूळ खात पडलेले अत्याधुनिक एचआरसीटी स्कॅन मशीन त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर, महाजन यांनी विविध विभागांना भेटी देऊन कर्मचारी व रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. आरटीपीसीआरचे रेकार्ड ठेवले जाते, तसे अँन्टिजन टेस्टचे रेकार्ड ठेवा, अशी सूचना केली. यावेळी बिटकोचे नोडल अधिकारी डॉ.जितेंद्र धनेश्वर यांनी रुग्णालयाबाबत माहिती दिली.या ठिकाणी एचआरसीटी मशीन धूळ खात पडलेले दिसल्यावर, महाजन यांनी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांना फोन करून विचारपूस केली असता, नागरगोजे यांनी रेडिओलॉजिस्ट नसल्याने मशीन बंद आहे, असे स्पष्ट केले. मशिन उद्यापासून सुरू करू, असे नागरगोजे यांनी सांगितले. रेडिओलॉजिस्ट नसल्याने ते बंद असल्याने रुग्णांना अडीच हजार रुपये मोजून बाहेर स्कॅनिंग करावे लागते, अशी तक्रार नगरसेवकांनी केली. महाजन म्हणाले की, ही बाब गंभीर आहे. रुग्णांचा मृत्यू होत असताना, मशीन बंद राहणे योग्य नाही. डॉ.नागरगोजे म्हणाले की, मशीनसाठी तंत्रज्ञ नियुक्त केले आहेत. चार रेडिओलॉजिस्टना नियुक्तीपत्र दिले आहे. दोघे त्वरित रुजू होणार आहेत. रेडिओलॉजिस्ट रुजू झाले नाही, तर खासगी रेडिओलॉजिस्ट नियुक्त करून मशीन लगेच सुरू करू, असे नागरगोजे यांनी स्पष्ट केले.गुरुवारपर्यंत सुरू करण्याच्या सूचनाबिटकोतील एचआरसीटी स्कॅनिंग मशीन, तसेच एमआरआय हे मशीन बंद असून, ते गुरुवारी सुरू झालेच पाहिजे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेतील दोशींचे कोणीही समर्थन केले जाणार नाही आणि दोषींवर कारवाई होईलच, असेही महाजन यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.छायाचित्र आर फोटोवर २८ गिरीश महाजन

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल