नाताळ सणानिमित्त शाळांमध्ये कार्यक्रम
By Admin | Updated: December 26, 2016 02:28 IST2016-12-26T02:27:47+5:302016-12-26T02:28:08+5:30
नाताळ सणानिमित्त शाळांमध्ये कार्यक्रम

नाताळ सणानिमित्त शाळांमध्ये कार्यक्रम
नाशिक : नाताळ सणानिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षकांनी नाताळ सणानिमित्त विविध गोष्टी सांगितल्या.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श शिशुविहार, गोरेराम लेन शाळेत नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापक आशा उमाप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. उज्ज्वला जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना नाताळ सणाविषयी माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थी सांताक्लॉज व मेरीच्या वेशभूषेत उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून सर्वांनी एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास रंजना देवरे, अर्चना वाळके, धनेश्वरी आवारे, छाया सोनवणे, मनीषा मते, संगीता वाटपाडे, उज्ज्वला जोंधळे, निर्मला आगळे, अर्चना देवरे, मनीषा काळे आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना देवरे यांनी केले.