बॅरिकेडिंगमुळे संध्याकाळी शहरात वाहतूककोंडी
By Admin | Updated: August 18, 2015 23:53 IST2015-08-18T23:50:14+5:302015-08-18T23:53:44+5:30
बॅरिकेडिंगमुळे संध्याकाळी शहरात वाहतूककोंडी

बॅरिकेडिंगमुळे संध्याकाळी शहरात वाहतूककोंडी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यातच ध्वजारोहणामुळे पोलीस बंदोबस्त व बॅरिकेडिंग यामुळे शहरातील काही भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
बुधवारी मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा असल्याने तसेच अनेक मंत्री शहरात दाखल झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख व्यवस्था बजावल्याचे चित्र शहरात बघायला मिळत होते. शहरात करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे कंपनी तसेच कार्यालयातून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. संध्याकाळी वरुणराजानेही हजेरी लावल्याने नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली.
शाळा, महाविद्यालये, क्लासेसमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही विशेष हाल झाले. ठक्कर बाजार, सीबीएस, महामार्ग या ठिकाणीही रस्ते वाहतूक बंद असल्याने बाहेरून आलेल्या प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र बघायला मिळाले. (प्रतिनिधी)