केंद्रीय कृषिमंत्री आले तरीही शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

By Admin | Updated: March 22, 2015 00:34 IST2015-03-22T00:33:55+5:302015-03-22T00:34:19+5:30

केंद्रीय कृषिमंत्री आले तरीही शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

Even if the Union Agriculture Minister came, the farmers hoped for water | केंद्रीय कृषिमंत्री आले तरीही शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

केंद्रीय कृषिमंत्री आले तरीही शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी

पिंपळगाव बसवंत : केंद्रीय कृषिमंत्री नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले कृषिमंत्री राधामोहन सिंह हे आपलेही गाऱ्हाणे ऐकून घेतील, या आशेने दोन तास रस्त्यावर शेकडो शेतकरी ताटकळत उभे होते; मात्र पोलिसांच्या धाकाने सर्व आशेवर पाणी फिरले.
पिंपळगाव बसवंत येथून पाच कि.मी. असलेले लोणवाडी गावातील रस्त्यावरून राधामोहन सिंह जाणार आहे हे माहीत झाल्यावर शेकडो शेतकरी सकाळी ९ वाजेपासून जमा झाले निवेदन तयार केली याच भागातील कारसूल येथे वीजबिल व कर्जमाफीसाठी चार दिवसांपासून उपोषणही सुरू आहे. मंत्री या रस्त्यावर दोन मिनिट थांबून आपले गाऱ्हाणे ऐकूण घेतील या आशेने हे शेतकरी रस्त्यावर थांबून राहिले. मात्र, पोलिसांनी आधीच सर्व शेतकऱ्यांना रस्त्यावर थांबू नका, असा दम दिला शेतकरी आधीच गारपिटीने अर्धेमेला झाला आहे. त्यातच पोलिसांची कार्यवाही होईल.
या धाकाने सर्व शेतकरी रस्त्याच्याकडेला ताफाकडे बघताच गप्प राहिले. दोन तास उभे राहूनही मात्र आमचे गाऱ्हाणे कोणी ऐकून घेतले नाही. कर्ज माफी द्या, विज बिल मापी दिली पाहिजे, अशी मागणी माणिक गवळी, बाळा जाधव, पुंडलीक काजळे, रावसाहेब चोपडे, सुरेश दौड, गोविंद काजळे, सुभाष कुशारे, प्रमोद शंकपाळ आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Even if the Union Agriculture Minister came, the farmers hoped for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.