मन्सुरा महाविद्यालयात जातीय सलोखा अभियान
By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T22:09:13+5:302014-07-25T00:34:09+5:30
मन्सुरा महाविद्यालयात जातीय सलोखा अभियान
मन्सुरा महाविद्यालयात जातीय सलोखा अभियान
संगमेश्वर : मन्सुरा इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालय, मालेगाव येथे जातीय सलोखा अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस उपअधीक्षक एम. आर. सवई, किल्ला पोलीस स्टेशनचे निरीक्षक एस. व्ही. कसबे, सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यावेळी उपस्थित
होते. यावेळी कडासने यांनी पवित्र कुराणातील दाखले देऊन जातीय सलोखा राखण्याविषयी आवाहन केले. पोलीस खाते जनतेच्या सेवेसाठीच असून, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्वधर्मसमभाव राखण्याविषयी कसबे यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांनी महिला संरक्षण याविषयी माहिती दिली. यावेळी मन्सुरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शहा अकील अहमद, प्रबंधक शकील अहमद शेख, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.(वाणिज्य वार्ताहर)