पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक पोलीस पथकाची स्थापना
By Admin | Updated: April 4, 2017 14:50 IST2017-04-04T14:50:34+5:302017-04-04T14:50:52+5:30
पर्यटनासाठी देशपरदेशातून येणा-या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलीस विशेष पथक स्थापन केले आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटक पोलीस पथकाची स्थापना
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 4 - नाशिक शहरात पर्यटनासाठी देश विदेशातून येणा-या पर्यटकांना सुरक्षित वाटावं किंवा एखाद्या आपात्कालीन समस्येतून त्यांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी पर्यटक पोलीस पथकाची स्थापना केली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर काळाराम मंदिरासमोर या पथकाच्या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, पर्यटक पोलीस पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक एस.व्ही अहिरराव व सी. एस पाटील आदी उपस्थित होते.