कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

By Admin | Updated: September 6, 2016 22:52 IST2016-09-06T22:52:37+5:302016-09-06T22:52:52+5:30

कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

Establishment of 'One Village One Ganpati' at Konambay | कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

कोनांबे येथे ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना

 कोनांबे : बुद्धीची देवता व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणरायाचे कोनांबे व परिसरात ढोल-ताशाच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एक गाव एक गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. सरपंच संजय डावरे यांच्याहस्ते पूजन करून गणरायाची स्थापना करण्यात आली.
कोनांबे येथे प्रथमच ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. गावात शिवम मित्रमंडळ, त्रिमूर्ती मंडळ, परसराम बाबा मित्रमंडळ, गुरुदत्त, मातोश्री, रेणुकामाता मित्रमंडळ, कावळीमळा मित्रमंडळ, मोठेबाबा मित्रमंडळ आदिंसह अनेक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत होती. तथापि, गावात एकता निर्माण होऊन कोणतेही गट-तट व हवेदावे टाळण्यासाठी सरपंच संजय डावरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शिवाजी डावरे, पोलीस पाटील पांडुरंग डावरे, जिल्हा सचिव सोसायटी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्ता पगार, माजी सरपंच मोहन डावरे, संतोष डावरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डावरे, बंडू डावरे, राजेंद्र लहामगे, अंबादास भागवत आदि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन गावातील सर्व मंडळांनी एकत्रित बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्याचे ठरविले.
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सरपंच संजय डावरे, उपसरपंच रंजना भागवत, विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक गवारे, शिवाजी डावरे आदिंसह सर्वच मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Web Title: Establishment of 'One Village One Ganpati' at Konambay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.