प्रिसाईज कंपनीत कामगार सेनेची स्थापना
By Admin | Updated: May 25, 2014 20:45 IST2014-05-25T20:43:28+5:302014-05-25T20:45:16+5:30
नाशिक : येथील अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रिसाईज व्हॅक्युम सिस्टम कंपनीत भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते कंपनीच्या प्रवेशद्वारावर संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे जिल्हा सरचिटणीस बंटी तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. याप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदि उपस्थित होते. संघटनेच्या अध्यक्षपदी कंपनीतील कैलास अहिरराव, उपाध्यक्षपदी पंकज वारके, सचिवपदी नवल सिंग, खजिनदारपदी हेमराज पाटील, संघटक राजू धामणे, तुषार गोडसे, तर सदस्यपदी अब्दूल अझहर, भोला राजक, विजय काळे, दत्तू शहाणे यांची निवड करण्यात आली.

फोटो कॅप्शन: अंबड औद्योगिक वसाहतीतील प्रिसाईज व्हॅक्युम सिस्टम कंपनीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या हस्ते भारतीय कामगार सेनेची स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी कामगारांसमवेत बंटी तिदमे, माजी महापौर विनायक पांडे, मनपा विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक तानाजी फडोळ, देवानंद बिरारी, सुभाष गायधनी आदि.