घराघरांत झाली कोकिळेची स्थापना
By Admin | Updated: July 31, 2015 23:36 IST2015-07-31T23:28:43+5:302015-07-31T23:36:12+5:30
व्रताला प्रारंभ : सुवासिनींमध्ये उत्साह

घराघरांत झाली कोकिळेची स्थापना
व्रताला प्रारंभ : सुवासिनींमध्ये उत्साह नाशिक : सौभाग्य आणि घरातील सुख-शांती, धनधान्य समृद्धी यासाठी केल्या जाणाºया कोकिळा व्रताला सुरुवात झाली असून त्यासाठी घराघरात कोकिळेच्या मूर्तीची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाऊ लागले आहे. यात महिनाभर एकवेळचा उपवास आणि कोकिळेचा आवाज ऐकल्यानंतर तो सोडण्याचा नियम आणि चतुर्मासाप्रमाणे त्याचे नियम आहेत. आपल्या इच्छेनुसार महिला हे व्रत करू शकतात. आषाढ महिन्यात अधिक आला तरच हे कोकिळा व्रत येते. यंदा सिंहस्थ आणि अधिक आषाढ आल्यामुळे सुमारे २२५ वर्षानंतर हे व्रत येत असल्याने महिलांमध्येही त्याबाबत आकर्षण आहे. स्वाभाविकच धार्मिक प्रवृत्ती असणाºया महिलावर्गात या अनोख्या कोकिळा व्रताची सिद्धता करीत असून साधारण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे व्रत केवळ तीन किंवा चार वेळेस येते तसेच अगदी बालपणीचे व्रत आठवत नसल्याने तरुण स्त्रियांमध्ये याबद्दल श्रद्धा, कुतूहल प्रकर्षाने व्यक्त होते आहे.