शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन

By Admin | Updated: June 1, 2014 01:24 IST2014-06-01T00:31:58+5:302014-06-01T01:24:41+5:30

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार व त्याबाबत शिक्षकांच्या तक्रारी याविषयी असलेल्या असंख्य तक्रारींची दखल घेत जिल्‘ातील १४ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हा समन्वय समितीची स्थापना केल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय गिते यांनी दिली.

Establishment of Coordination Committee for Teachers Organizations | शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन

शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार व त्याबाबत शिक्षकांच्या तक्रारी याविषयी असलेल्या असंख्य तक्रारींची दखल घेत जिल्‘ातील १४ शिक्षक संघटनांनी एकत्र येत जिल्हा समन्वय समितीची स्थापना केल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख संजय गिते यांनी दिली.
या समितीच्या अध्यक्षपदी गुरफान अन्सारी तर कार्यवाहपदी चंद्रकांत कुशारे यांची निवड एकमताने करण्यात आली. शिक्षक संघटनेचे नेते रवींद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेत नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघटना, राज्य माध्यमिक शिक्षक संघटना, जिल्हा शिक्षक परिषद, शहर शिक्षक परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, शिक्षकेतर शिक्षक संघटना, ज्युनियर कॉलेज शिक्षक संघटना, क्रीडा शिक्षक संघटना, अपंग शिक्षक संघटना, अल्पसंख्याक शिक्षक संघटनेसह १४ शिक्षक संघटनांचा या समन्वय समितीत समावेश आहे. समन्वय समितीची नुकतीच बैठकही झाली. या समितीच्या सदस्यपदी साहेबराव कुटे, के.के. अहिरे, एस.बी. शिरसाट, बी.के. सानप, रवींद्र जोशी, आर.टी. थेटे, विजय वडुलेकर, कैलास देवरे यांच्यासह सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Establishment of Coordination Committee for Teachers Organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.