देशातील शंभर कंपन्यांमध्ये ‘ईएसडीएस’चा समावेश
By Admin | Updated: July 7, 2016 00:38 IST2016-07-06T23:23:05+5:302016-07-07T00:38:54+5:30
देशातील शंभर कंपन्यांमध्ये ‘ईएसडीएस’चा समावेश

देशातील शंभर कंपन्यांमध्ये ‘ईएसडीएस’चा समावेश
नाशिक : ग्रेट प्लेस टू वर्क या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रा. लि. ही कंपनी नोकरीसाठी देशातील सर्वोत्तम शंभर कंपन्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.
विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ८०० पेक्षा अधिक आणि एक लाख ५५ हजार ११९ कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदविला. भारतात अशाप्रकारे केले जाणारे हे सर्वांत मोठे सर्वेक्षण ठरले. संस्थेवरील विश्वास, कर्मचाऱ्यांमधील मैत्रीपूर्ण वातावरण, कर्मचारीकेंद्रित धोरण आदिंबाबतचा अभ्यास या सर्वेक्षणाअंतर्गत करण्यात आला. त्याशिवाय कर्मचाऱ्यांचे आचरण, तत्त्वज्ञान आणि संस्थेची मूल्ये अभ्यासण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्यावरून कर्मचाऱ्यांचे समाधान आदिंबाबतचे निरीक्षणे समोर आली.
या सर्वेक्षणात ईएसडीएस कंपनीचा नोकरीसाठी देशातील सर्वोत्तम शंभर कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला. संस्थेची उभारणी ही कर्मचाऱ्यांच्या एकमेकांविषयी आणि कंपनीविषयी असणारा आदर, सद््भाव, सहकार्य आणि मजबूत संबंधांतून झालेली असून, केवळ फायदे आणि तोटे यातून नसल्यानेच कंपनीचा यामध्ये समावेश होऊ शकला, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)