पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे पलायन

By Admin | Updated: February 15, 2017 23:11 IST2017-02-15T23:10:40+5:302017-02-15T23:11:14+5:30

पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे पलायन

The escape of the grape traders of Pimpalgaon Baswant | पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे पलायन

पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्यांचे पलायन

 पिंपळगाव बसवंत : येथील द्राक्ष व्यापारी अशोक गुप्ता, विकास गुप्ता यांनी द्राक्ष उत्पादक शेतकरीवर्गाला पंचावन्न लाखाला चुना लावून पलायन केले आहे.
या बाबतीत शेतकरीवर्गानी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीत सदरचे व्यापारी हे मुखेड, खडकमाळेगाव, शिरसाणे गोरठान, खडकओझर, धोंडगव्हाण, वाडी आदि भागात द्राक्ष खरेदी करत होता.
काही शेतकरीवर्गाला सुरुवातीच्या काळात रोख पैसे देऊन विश्वास संपादन केला होता; मात्र मागील दोन आठवडे द्राक्ष खुडे करून घेतले व अचानक हे दोघे व्यापारी गायब झाल्याने शेतकरी हतबल होऊन पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून यामध्ये सुनील वाघ, विलास जाधव, संजय जाधव, चंद्रकांत रसाळ, रामभाऊ शिंदे, गणेश पगार, तात्याबा पगार, अशोक गवळी, संजय पगार, भाऊसाहेब निफाडे, प्रभाकर जाधव, निवृत्ती देशमाने, सुरेश घुले, किशोर माडे, योगेश पूरकर आदि शेतकऱ्यांचे द्राक्षाचे पैसे घेऊन पसार झाले असून, अजूनही अनेक गावांतील शेतकऱ्यांचाही यात समावेश आहे.

Web Title: The escape of the grape traders of Pimpalgaon Baswant