दिंडोरीत ६० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:24+5:302021-05-08T04:15:24+5:30

दिंडोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह इमारतीत साठ ऑक्सिजन बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटरचे लोकार्पण साखर ...

Equipped Covid Center with 60 beds in Dindori | दिंडोरीत ६० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

दिंडोरीत ६० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

Next

दिंडोरी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृह इमारतीत साठ ऑक्सिजन बेडचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटरचे लोकार्पण साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे व नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. यावेळी श्रीराम शेटे यांनी सांगितले, दिंडोरी तालुक्यात ऑक्सिजन बेडची कमतरता आता जाणवणार नाही, या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून जनतेची सेवा करून रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन केले तर झिरवाळ यांनी नागरिकांना शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, मुख्याधिकारी नागेश येवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे, डॉ. विलास पाटील, माजी नगरसेवक माधवराव साळुंखे, कैलास मवाळ, अविनाश जाधव, पोलीस निरीक्षक अनंत तारगे उपस्थित होते. आभार स्वीय सहायक धनराज भट्टड यांनी मानले.

इन्फो

आवाहनाला प्रतिसाद

कोविड सेंटरसाठी नरहरी झिरवाळ यांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत परनोल रिकोर्ड कंपनीने ५० परिपूर्ण बेड दिले असून, इतर काही कंपन्यांनीही हातभार लावला आहे. त्यामुळे हे सुसज्ज कोविड सेंटर उभे राहू शकल्याचे सांगण्यात आले.

फोटो - ०७ दिंडोरी ऑक्सिजन

दिंडोरी येथे ६० ऑक्सिजन बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे. समवेत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, विश्वासराव देशमुख आदी.

===Photopath===

070521\07nsk_36_07052021_13.jpg

===Caption===

 फोटो - ०७ दिंडोरी ऑक्सीजन दिंडोरी येथे ६० ऑक्सीजन बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करताना साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे. समवेत विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर,  तहसीलदार पंकज पवार,  विश्वासराव देशमुख आदी. 

Web Title: Equipped Covid Center with 60 beds in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.