शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
4
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
5
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
6
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
7
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
9
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
10
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
11
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
12
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
13
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
14
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
15
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
16
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
17
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
18
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
19
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
20
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक

३५० खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 00:59 IST

त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देभुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन : क्रेडाई व मनपाचा पुढाकार

नाशिक : त्र्यंबकरोडनजीक क्रेडाईच्या वतीने उभारण्यात आलेल्या ठक्कर डोममध्ये ‘कोविड-१९ सेंटर’चे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. ३५० खाटांनी सुसज्ज या कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनचे ५० बेड असून, पुुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी सुसज्ज तयारी करण्यात आली आहे.कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्यसेवेचे एक आदर्श मॉडेल असून, त्याचा उपयोग हॉस्पिटल्समधील बेड संपुष्टात आल्यानंतरच केला जाणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, माजी खासदार समीर भुजबळ, नोडल आॅफिसर डॉ. आवेश पलोड, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव,क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जीतूभाई ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, सचिन बागड, हितेश पोद्दार आदी उपस्थित होते.यावेळी मनपा आयुक्त गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रु ग्णांची संख्या कमी झाली असून बंगले, कंपनी परिसर तसेच सोसायटी परिसरात रु ग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.क्रे डाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार क्रेडाइतर्फे ही सुसज्ज आणि आदर्श कोविड सेंटरची उभारणी करण्यात आल्याचे सांगितले.कोविड सेंटरमधील अशी आहे सुविधारिक्रि एशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके, टीव्ही यांसह मनोरंजनाची तसेच रु ग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटरमध्ये निर्माण झाले आहे, असे भुजबळ म्हणाले. महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रे डाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर सर्वोत्तम उपचार होतील, असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यChhagan Bhujbalछगन भुजबळ