विजेचा दाब वाढून उपकरणे जळाली
By Admin | Updated: March 23, 2017 22:32 IST2017-03-23T22:31:46+5:302017-03-23T22:32:14+5:30
सिन्नर : येथील देवीमंदिर रस्त्यावरील देशमुख मळा व भगवतीनगर भागात बुधवारी रात्री अचानक वाढलेल्या उच्च दाबामुळे सुमारे ४० घरातील विद्युत उपकरणे जळल्याची घटना घडली

विजेचा दाब वाढून उपकरणे जळाली
सिन्नर : तालुक्यातील मोह गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागून त्यात भाजल्याने एका दुभत्या गायीचा मृत्यू झाला. तर अन्य एक गाय सुमारे साठ टक्के भाजली असून तिच्यावर पशुुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.
मोह गावालगत वाळू रामचंद्र बोडके यांची वस्ती आहे. वस्तीलगतच गोठा असून त्यात बोडके यांच्या दुभत्या गायी बांधलेल्या होत्या. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागल्याचा अंदाज आहे. उन्हाच्या तडाख्यात लाकडी गोठ्याला अचानक आग लागल्याने क्षणार्धात आग भडकली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेली दुभती गाय जागीच मृत्युमुखी पडली. तर अन्य एक दुभती गाय जखमी झाली.
या घटनेची माहिती सुदाम बोडके यांनी तहसील कार्यालयात दिली. तलाठी अरुण फसाळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या आगीत दुभत्या गायीचा मृत्यू होण्यासह शेती औजारे, लाकडी खांब, चौकट, अडगळीच्या लाकडी वस्तू असे सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी काशीनाथ बोडके, गोरख बोडके, प्रभाकर भिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)