सभापती निवडणुकीत समीकरणे बदलणार

By Admin | Updated: April 4, 2016 00:10 IST2016-04-03T23:46:31+5:302016-04-04T00:10:55+5:30

सातपूर प्रभाग : दोघांची भूमिका निर्णायक

The equations in the chairmanship elections will change | सभापती निवडणुकीत समीकरणे बदलणार

सभापती निवडणुकीत समीकरणे बदलणार

 सातपूर : माकपचे नगरसेवक सचिन भोर यांनी भाजपात प्रवेश केल्याने प्रभाग सभापती निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तरीही पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
सद्यस्थितीत सातपूर विभागात मनसेचे प्राबल्य असले तरी स्पष्ट बहुमत नसल्याने फक्त मनसेच्या सुरेखा नागरे व उषा शेळके या दोनच नगरसेवकांना सभापतिपद मिळाले आहे. तर पहिल्या वर्षी माकपचे एकमेव नगरसेवक असलेले सचिन भोर आणि दुसऱ्या वर्षी शिवसेनेचे एकमेव नगरसेवक असलेले विलास शिंदे यांना सभापतिपद मिळाले होते. आता माकपचे सचिन भोर यांनी भाजपात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेतील महाआघाडी पाहता सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत मते आणि उषा अहिरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे दोन नगरसेवक मनसेसोबत असल्याने सभापतिपद मनसेला मिळू शकते किंवा राष्ट्रवादीला संधी मिळू शकते, असा राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण मनसेचे सहा नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे दोन अशी संख्या आठ होणार पडल्याने महायुतीचा सभापती होऊ शकतो. (वार्ताहर)

Web Title: The equations in the chairmanship elections will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.