शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

समान काम समान वेतनासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:46 IST

महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाध्याधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

ठळक मुद्देलिपिक संवर्गीय कर्मचाऱ्यांचे नाशिकमध्ये आंदोलन गोल्फक्लबपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा समान काम, समान वेतनासह जून्या पेन्शन योजनेची मागणी

नाशिक: महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत गट ‘क ’ तथा लिपिक संवर्गातील नाशिक जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२२) शहरातून मोर्चा काढून जिल्हाध्याधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. नशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाकाढून जिल्हाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.  यात लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करणे व मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपिकांचे एकसारखे पदनाम करण्याच्या मागणीसह डीसीपीएस /एनपीएस योजना बंद करून मूळची १९८२ ची जूनी सेवानिवृत्ती योजना लागू करण्याची व सातव्या वेतन आयोगाचा वर्षाचा फरक रोखीने देण्यात यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यासोबतच बक्षी समितीच्याशिफारशिंनुसार  केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे, लिपिकांना अश्वासित प्रगती योजनेचा लाभ १०, २०, व ३० अशा टप्प्यात देण्यात यावा, सुधारीत आकृतीबंध  लागू करताना लिपिक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत अथवा कंत्राटी पद्धतीने निर्मिती न करता ती  स्थायी स्वरुपाची करण्यात यावी, लिपिकांच्या अर्जित रजा साठविण्याची किमान मर्यादा काढून टाकण्यात यावी, तसेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा व नियमित प्रशिक्षण देण्यात यावे या मागण्यांचाही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात  समावेश आहे. दरम्यान,  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास अभिवादन करून मोर्चाता समारोप केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी  हा शासनासाठी इशारा असून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेने दिला आहे. यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख, समन्वयक विनायक केदारे, कार्याध्यक्ष विश्वास कचरे, रमेश जेजूरकर,  निलेश पाटील, हिरामण झोटींग, आनंद कांगणे, रंजना मांडे, निता पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकGovernmentसरकारEmployeeकर्मचारीcollectorजिल्हाधिकारी