त्र्यंबकेश्वरला पर्यावरणपूरक विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:51+5:302021-09-21T04:15:51+5:30
त्र्यंबकेश्वर : अनंत चतुर्थीनिमित्ताने गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींबरोबरच घरोघरी बसविलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या सार्वजनिक जलाशयांभोवती नागरिकांनी गर्दी ...

त्र्यंबकेश्वरला पर्यावरणपूरक विसर्जन
त्र्यंबकेश्वर : अनंत चतुर्थीनिमित्ताने गावातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींबरोबरच घरोघरी बसविलेल्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी त्र्यंबकेश्वरच्या सार्वजनिक जलाशयांभोवती नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात पीओपी मूर्तींचे दान करण्यात आले, तर शाडूच्या मूर्तींचे विसर्जन गावातील बिल्वतीर्थ जलाशय, तसेच मुकुंदेश्वर तलावातून करण्यात आले. ‘माझी वसुंधरा’ याद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या वर्षीपासून पालिकेने चांगल्या प्रकारे काम सुरू केले आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होताना प्रदूषण होऊ नये म्हणून मूर्ती विरघळण्यासाठी अमोनियम बाय कार्बोनेट पावडरचे मोफत वितरण, मूर्ती दान घेरून त्यांचे कृत्रिम विसर्जन करणे, आदी कामे करण्यात आली. ‘माझी वसुंधरा’अंतर्गत मुख्याधिकारी संजय जाधव, शहर अभियंता इंजि. अभिजित इनामदार, पायल महाले आदींचा सहभाग महत्त्वाचा आहे.
----------------------------मूर्ती दान स्वीकारताना नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव, शहर अभियंता अभिजित इनामदार, पायल महाले, इंजि. राहुल शिंदे, विजय सोनार, अमित ब्राह्मणकर आदी. (२० टीबीके गणेश)
200921\20nsk_8_20092021_13.jpg
२० टीबीके गणेश