जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

By Admin | Updated: September 1, 2014 21:38 IST2014-09-01T21:38:33+5:302014-09-01T21:38:33+5:30

जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

Environmental supplement workshop in Junkai Secondary School | जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

 

कळवण : येथील जानकाई माध्यमिक विद्यालयात शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मूर्ती तयार केल्या. यामूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कला शिक्षक मनीष देवरे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे गणेशमूर्ती बनविल्या होत्या.
शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. जोशी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने भिजविलेली शाडूमाती देण्यात आली.
कलाशिक्षक मनीष देवरे यांनी उपस्थिताना कलात्मक पद्धतीने टप्याटप्प्याने मूर्ती बनविण्याची कला शिकविली. दरवर्षी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, असे मत सहभागी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम पानसरे, वन अधिकारी दीपक वडगे
उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक बी. पी. सूर्यवंशी यांनी
केले. कार्यशाळेस शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Environmental supplement workshop in Junkai Secondary School