शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
4
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
5
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
6
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
7
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
8
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
9
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
10
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
11
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
12
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
13
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
14
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
15
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
16
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
17
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
18
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
19
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
20
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!

केनिंगस्टन क्लबला  पर्यावरण विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:56 IST

माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

नाशिक : माजी महापौर प्रकाश मते यांना ४८ तासांत दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागणाऱ्या महापालिकेने आता याच कालावधीत पर्यावरण विभागाची दुसरी नोटीस धाडली आहे. त्यामुळे हा संघर्ष चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पूररेषतील बांधकामे हटविण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर याच मालकाच्या ग्रीन फिल्डवर हातोडा चालविण्यात आला होता. त्यावेळी उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही या लॉन्सची भिंत हटविल्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि महापालिका आयुक्तांना न्यायालयात माफीनामा मागण्याची वेळ आली. त्यानंतर केनिंगस्टन क्लबला आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याच दिवशी नोटीस दिली होती. या क्लबच्या संरक्षक भिंतीमुळे महापालिकेची गोदापात्रातील गॅबियन वॉल ढासळली असून, त्याबाबत नोटीस बजावली होती; परंतु हा क्लब महापालिका हद्दीत नसून जलालपूर हद्दीत येत असल्याने संचालकांनी त्यास आक्षेप घेतला. त्यानंतर महापालिकेने जिल्हाधिकाºयांमार्फत कारवाईचा प्रयत्न केला. मात्र  त्यांनी हा विषय पालिकेकडेच टोलवला. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने गॅबियन  वॉलच्या नुकसानीपोटी सुमारे  दीड कोटी रुपयांची भरपाई ४८ तासांत करण्याची मागणी केली  आहे. या नोटिसीला २४ तास उलटत नाही तोच आता महापालिकेच्या पर्यावरण विभागानेदेखील नोटीस बजावली आहे. नदीपात्रात भराव पडल्याने प्रवाहाला अवरोध निर्माण झाला असल्याचा आक्षेप घेण्यात आला असून अन्य मुद्दे गुरुवारी (दि. २८) दिलेल्या नोटिसीप्रमाणेच आहेत.महापालिकेने या क्लबला गॅबियन वॉलच्या नुकसानभरपाई पोटी १ कोटी ४८ लाख रुपये देण्याची मागणी केली असून, त्यासाठी दिलेली ४८ तासांची मुदत शनिवारी (दि. ३०) संपणार आहे. संंबंधित क्लब संचालक ही रक्कम भरतात की विरोध करतात, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका