उद्योजकता विकास कार्यक्रम नाशकात

By Admin | Updated: June 29, 2014 00:44 IST2014-06-29T00:44:28+5:302014-06-29T00:44:46+5:30

उद्योजकता विकास कार्यक्रम नाशकातn

Entrepreneurship Development Program In Nashik | उद्योजकता विकास कार्यक्रम नाशकात

उद्योजकता विकास कार्यक्रम नाशकात

 

नाशिक : केंद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेनरशीप डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अर्थात ‘स्टेड’ हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, यासाठी उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक सुनील चांडक यांनी दिली. यासाठी येत्या ३ व ४ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. स्वत:चा उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर राजन लोंढे यांनी केले आहे. या प्रकल्पांतर्गत २०० विज्ञान-तंत्रविज्ञान शिक्षितांची निवड करण्यात येणार असून, त्यांना उद्योग निवडीपासून उभारणीपर्यंतचे प्रशिक्षण, तसेच तंत्रज्ञान, मार्केटिंग, वित्तसहाय्य, जागा आदिंसाठी विशेष पाठपुरावा केला जाणार आहे. ही सर्व सेवा विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘स्टेड’चे संचालक अभिजित खत्री यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Entrepreneurship Development Program In Nashik