उद्योजक स्व. चांडक यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:58+5:302021-09-13T04:13:58+5:30
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चांडक यांच्या जीवनावर आधारित ‘रुपये एकशे दहा, आणि अर्धा कप चहा’ या स्मरणिकेचे प्रकाशन वर्षाताई चांडक, ...

उद्योजक स्व. चांडक यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन
प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चांडक यांच्या जीवनावर आधारित ‘रुपये एकशे दहा, आणि अर्धा कप चहा’ या स्मरणिकेचे प्रकाशन वर्षाताई चांडक, लालाभाऊ यांचे बालमित्र, वाहनचालक, हितचिंतक अशा ३० जणांच्या हस्ते झाले. लालाभाऊ स्वतःजवळ केवळ ११० रुपये ठेवत असत. ज्यांची बाजारात पत असते त्यांची ऐपत कधी कोणी विचारत नाही, असे प्रतिपादन करत उद्योजक अतुल चांडक यांनी भाऊंच्या मोठेपणाची उदाहरणे दिली. लालाभाऊ जागरूक वाचक होते. सभोवतालच्या घडामोडी व बातम्यांवर ते नेहमी प्रतिक्रिया देत असत. यासह लालाभाऊ यांच्या अनेक अनुभवांना उजाळा देत समाजाप्रति असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेची उदाहरणे ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र तनपुरे यांनी दिली. डाव्या हाताने दिलेले दान, उजव्या हाताला कळू नये या भूमिकेतून समाजास मदत करताना भाऊ प्रसिद्धीपासून दूर राहिले. असे ते म्हणाले. स्मरणिकेचे संपादक राजेंद्र देशपांडे यांनी प्रस्ताविक केले. विवेक चांडक व मानव चांडक यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना वडिलांचा वारसा पुढे चालविण्यासाठी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उद्योजक विक्रम सारडा, एम. जी. कुलकर्णी, प्रकाशभाऊ वाजे, पुूजाभाऊ सांगळे, कृष्णाजी भगत, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, नाशिक रोड मसापचे कार्याध्यक्ष व आर्किटेक्ट उन्मेष गायधनी, जयप्रकाश जातेगावकर, उमेश मुंदडा, मविप्रचे संचालक हेमंत वाजे यांच्यासह नाशिक व सिन्नर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
फोटो - १२ सिन्नर चांडक
सिन्नरचे उद्योजक लालाभाऊ चांडक यांच्या जीवनावरील ‘रुपये ११० व अर्धा कप चहा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करताना वर्षाताई चांडक व मान्यवर.
120921\12nsk_22_12092021_13.jpg
फोटो - १२ सिन्नर चांडक