फ्रेंडशिप डेसाठी युवा वर्गात उत्साह

By Admin | Updated: August 1, 2015 00:49 IST2015-08-01T00:36:17+5:302015-08-01T00:49:12+5:30

नवीन गॅजेट : सेलिब्रेशनच्या पध्दती बदलल्या

The enthusiasm in the youth category for Friendship Day | फ्रेंडशिप डेसाठी युवा वर्गात उत्साह

फ्रेंडशिप डेसाठी युवा वर्गात उत्साह

नाशिक : आॅगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्रीदिन अर्थात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात येतो. महाविद्यालयांमध्ये या डे चे सेलिब्रेशन बघायला मिळते. सगळे मित्र एकमेकांना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून आणि विविध भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात.
मैत्री म्हणजे : कोणासाठी कट्ट्यावरची मज्जामस्ती तर कोणासाठी प्रेम, कोणासाठी आधार देणारी यारी तर कोणासाठी केवळ दुनियादारी, तर काहींसाठी शब्दांत सांगता न येणारं बरंच काही..! काही नाती एका व्याखेत बसवणं अगदी अवघड होऊन जातं. कारण प्रत्येकाने त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या मैत्रीतील अनेक पैलू समोर येत असतात. मैत्री हे नातंच असं आहे, जे प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. या मैत्रीला साजरं करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिवस, अर्थात फ्रेंडशिप डे.
नुकतेच अ‍ॅडमिशन घेऊन विद्यार्थ्यांचे कॉलेज सुरू झालेलेअसून यात नवीन मित्र-मैत्रिणींचे अनेक ग्रुप बघायला मिळतात आणि हेच मित्र फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स बनवतात. फ्रें डशिप डे साजरा करण्याच्या दृष्टीने शहरातील बाजारपेठा सजल्या असून अनेक दुकानांमध्ये मनगटावर बांधण्यासाठी रंगीबेरंगी बॅण्ड्स विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी पाच रुपयांपासून १३० ते १५० रुपयांपर्यंत ह्या बॅण्ड्सच्या किमती आहेत.
महाविद्यालयांमध्ये फेरफटका मारून फ्रेंडशिप डेच्या सेलिब्रेशनविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राची आवड ओळखून भेटवस्तू देणार असल्याचे सांगितले. यामध्ये चॉकलेट, पुस्तकं, आवडणाऱ्या गायकांच्या आॅडिओ सीडीज्, किचेन्स, फोटोंचे कोलाज, फोटो असलेले टी मग, घड्याळ, टेडी बिअर, उशी, लॅपटॉप बॅग, पर्यावरणाची आवड असणाऱ्या मित्राला झाडांचे रोपसुध्दा देणार असल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले. काही विद्यार्थ्यांनी हातातले बॅण्ड्स दुसऱ्या दिवशी फेकून देण्यापेक्षा कायम लक्षात राहण्याच्या दृष्टीने तसेच या दिवसाच्या आठवणी अविस्मरणीय राहाव्यात यासाठी काहीतरी वस्तू गिफ्ट म्हणून देणार असल्याचेही ग्रुप बघायला मिळाले.
फ्रेंडशिप डे हा वर्षातला एक खास दिवस आहे, जो मित्र-मैत्रिणींसाठी असतो. तो साजरा करण्यास काहीच हरकत नाही, यानिमित्ताने जुने मित्र भेटतात, जुन्या आठवणींना उजाळा तर मिळतोच, पण त्या वेळी केलेली मज्जा भविष्यात रमायला सुंदर आठवणींचे क्षण देत असते.

Web Title: The enthusiasm in the youth category for Friendship Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.